KEC International Share Price | ऑर्डरबुक मजबूत होताच मल्टिबॅगर शेअरची तुफान खरेदी, स्टॉकमध्ये नवीन रॅलीची संकेत

KEC International Share Price | केईसी इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.42 टक्क्यांच्या वाढीसह 893 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. नुकताच या कंपनीला भारत आणि अमेरिकेतील प्रसारण आणि वितरण प्रकल्पांसाठी 1422 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ही बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी निर्माण झाली होती. ( केईसी इंटरनॅशनल कंपनी अंश )
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22875 कोटी रुपये आहे. केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 968.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 551 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी केईसी इंटरनॅशनल स्टॉक 0.045 टक्के घसरणीसह 885.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. केईसी इंटरनॅशनल कंपनीने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून भारतातील 765kV आणि 400 kV ट्रान्समिशन लाईन्ससाठीचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे. याव्यतिरिक्त कंपनीला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कंपनीमध्ये सबस्टेशन संरचना स्थापन करण्याचे काम मिळाले आहे.
मागील आठवड्यात या कंपनीने सांगितले की, कंपनीने भारत, मध्यपूर्व, ऑस्ट्रेलिया आणि यूएसमध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन प्रकल्प संबंधित 1000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळवल्या आहेत. या कॉन्ट्रॅक्टमध्ये भारतातील पॉवर ग्रीडमधून 765 केव्हीची ट्रान्समिशन लाइन टाकणे आणि 785 केव्ही जीआयएस सबस्टेशन, यूएईमधील 132 केव्ही ट्रान्समिशन लाइन, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएमध्ये टॉवर्सचा पुरवठा, यूएसएमध्ये हार्डवेअर आणि पोलचा पुरवठा करणे, यासारख्या कामाचा समावेश आहे.
केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या सीईओने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, नवीन ऑर्डरसह केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या ऑर्डरबुकचा आकार 2024 या वर्षात 7500 कोटीच्या पार गेला आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी जास्त आहे. केईसी इंटरनॅशनल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा मार्च 2024 तिमाहीत 110.3 टक्क्यांच्या वाढीसह 151.75 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मार्च 2023 मध्ये या कंपनीला 72.17 कोटी रुपये नफा झाला होता. मार्च तिमाहीत या कंपनीची निव्वळ विक्री 6164.83 कोटी रुपये होती. जी वार्षिक आधारावर 11.6 टक्क्यांनी वाढली आहे. केईसी इंटरनॅशनल ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी वीज पारेषण आणि वितरण, रेल्वे, नागरी अभियांत्रिकी, शहरी पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा, तेल आणि गॅस पाइपलाइन आणि केबल्ससह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | KEC International Share Price NSE Live 25 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK