22 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 25.19 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक सध्याच्या किमतीवरून 20 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. ( येस बँक अंश )

त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा इंडिया फर्मने या शेअरवर 17 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 24.66 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

येस बँकेची निव्वळ व्याज मार्जिन आणि मालमत्तेवरील परतावा तिमाही दर तिमाही आधारावर स्थिर राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने माहिती दिली की, येस बँकेने स्थिर एनआयएम नोंदवले मात्र बँकेच्या ओपेक्स आणि क्रेडिट कॉस्टमध्ये तिमाही आधारावर घट झाली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने माहिती दिली की, येस बँक आपले क्रेडिट खर्च कमी करण्याबरोबरच 2025 आणि 2026 पर्यंत आपले ROA अनुक्रमे 0.7 टक्के आणि 1 टक्क्यांनी सुधारू शकते.

जून तिमाहीत येस बँकेने 47 टक्के वाढीसह 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 342.52 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मात्र तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 32 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर 20 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून ‘सेल’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने येस बँक स्टॉकवर 19 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. परकीय ब्रोकरेज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग देऊन 17 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 25 July 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x