23 November 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Reliance Power Share Price | 30 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक 'पॉवर' दाखवणार, खरेदीला गर्दी, पुन्हा मालामाल करणार

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.26 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहोचली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

या काळात रिलायन्स पॉवर स्टॉक तब्बल 2400 टक्के वाढला आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 29.69 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जर तुम्ही 23 मे 2008 रोजी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 लाख रुपये झाले असते. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर पोहोचले होते. 24 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 28.26 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 11 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 टक्के वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.53 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने आपली संपूर्ण कर्ज थकबाकी परतफेड केली आहे. या कंपनीवर 800 कोटी रुपये कर्ज होते, जे बँकांना परतफेड करण्यात आले आहे. डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान रिलायन्स पॉवर कंपनीने IDBI बँक, ICICI बँक, Axis बँक आणि DBS बँक यासह अनेक बँकांचे कर्ज सेटलमेंट केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 25 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x