22 November 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

L&T Share Price | L&T शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक 4151 रुपयांची पातळी गाठणार, कमाईची मोठी संधी

L&T Share Price

L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस Citi ने एल अँड टी स्टॉकवर 4396 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, एल अँड टी कंपनीला भारत आणि मध्य पूर्वेतील कॅपेक्स वाढीचा फायदा होऊ शकतो. CLSA फर्मने L&T स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 4151 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )

जेफरीजने देखील या स्टॉकची टारगेट प्राइस 3970 रुपयेवरून 4165 रुपये केली आहे. जेपी मॉर्गनने एल अँड टी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 3857 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. आणि बर्नस्टीनने 3800 रुपये आणि नोमुराने 4000 रुपये टार्गेटसह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी एल अँड टी स्टॉक 1.29 टक्के वाढीसह 3,665.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कंपनीचा महसूल 15 टक्क्यांनी वाढून 55120 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. यासह कंपनीचा निव्वळ नफा 12 टक्क्यांच्या वाढीसह 2786 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीची ऑर्डर बुक 19 टक्क्यांच्या वाढीसह 4,90,881 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कंपनीने 55120 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता. यामध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय महसूल 26248 कोटी रुपये होता, जो एकूण महसुलाच्या 48 टक्के आहे. जून तिमाहीत या कंपनीला 70936 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. लार्सन अँड टुब्रो कंपनीचा EBITDA 15 टक्के वार्षिक वाढीसह 5615 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

गुरुवारी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 3628.80 रुपये या उच्चांक आणि 3536.15 रुपये या नीचांक किमती दरम्यान व्यवहार करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने लोकांना 42 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 मध्ये हा स्टॉक फक्त 3 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळी 3,948.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2,586.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.98 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 26 July 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x