24 November 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर प्राईस 1,294 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक रेटिंग अपग्रेड

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1089.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. आणि शुक्रवारी देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत होता. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, तज्ञांनी या शेअरची रेटिंग अपग्रेड केली आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 1,116.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1294 रुपयेपर्यंत वाढू शकतात. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 593.50 रुपये होती. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नोमुराने टाटा मोटर्स स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी ब्रोकरेज हाऊसने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर न्यूट्रल रेटिंग दिली होती. आता नोमुरा फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 1294 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. नोमुरा फर्मच्या मते, भारतातील प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये टाटा कर्व आणि हॅरियर ईव्ही लाँच झाल्यास टाटा मोटर्स कंपनीच्या सेलिंग व्हॉल्यूमला समर्थन मिळू शकते.

मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 639.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1089.05 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 2 वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 640 टक्के मजबूत झाली आहे. याकाळात टाटा मोटर्स स्टॉक 147.20 रुपयेवरून वाढून 1089.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2024 यावर्षात टाटा मोटर्स स्टॉक 39 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x