23 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता
x

Vedanta Share Price | वेदांता शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. S&P ग्लोबल रेटिंग्स फर्मने वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘CCC+’ वरून ‘B’ केली आहे. कारण कंपनीने आपली भांडवली संरचना आणि तरलता सुधारली आहे. ( वेदांता कंपनी अंश )

वेदांता कंपनीची डिसेंबर 2025 पर्यंतची कर्ज परिपक्वता पूर्ण करण्याची क्षमता आणि भांडवल उभारणी, लाभांश वाटप करण्याची क्षमता यामुळे तज्ञांनी कंपनीची रेटिंग अपग्रेड केली आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी वेदांता स्टॉक 438.75 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 3.79 टक्के वाढीसह 447.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ब्रोकरेज फर्म, अँटिक स्टॉक ब्रोकिंगने वेदांत स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 465 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने वेदांता स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 320 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,73,523.15 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 1.17 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

वेदांता स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 12.18 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 59.51 टक्के आणि दोन वर्षात 84.40 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 506.85 रुपये होती. नीचांक किंमत पातळी 207.85 रुपये होती. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 63.89 टक्के, आणि पाच वर्षांत 171.23 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षांत वेदांता स्टॉक फक्त 52.25 टक्के मजबूत झाला आहे.

S&P ग्लोबल फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता रिसोर्सेस कंपनीने वेदांता लिमिटेड कंपनीचे 1.4 अब्ज डॉलर्स मूल्याचे कर्ज दायित्वे पूर्ण करण्यासाठी पुरेशी रक्कम जमा केली आहे. वेदांता कंपनीने जूनमध्ये 2.6 टक्के भाग भांडवल विकून 500 दशलक्ष डॉलर्स रक्कम जमा केली आहे. वेदांता कंपनीने आपली 65 टक्के गुंतवणूक असलेली उपकंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये 1.25 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करून तरलता वाढवली आहे. S&P फर्मचा अंदाज आहे की, पुढील 12 महिन्यांत वेदांता रिसोर्सेस कंपनीचे कर्ज आणखी 1 बिलियन डॉलर्सने कमी होईल.

एप्रिल 2026 मध्ये देय असलेल्या 1.2 बिलियन डॉलर्स कर्जाची परतफेड ही वेदांता कंपनीच्या स्टॉकसाठी मुख्य ट्रिगर ठरू शकते. हे कर्ज डिसेंबर 2025 पर्यंत परतफेड करणे आवश्यक आहे. S&P फर्मने वेदांता कंपनीसाठी 2025-2026 या आर्थिक वर्षांसाठी 5.5-6.0 अब्ज डॉलर्स EBITDA अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीच्या स्टॉक वाढीला वस्तूंच्या वाढत्या किमती आणि ॲल्युमिनियममधील खर्च कमी करण्याच्या उपक्रमांचा आधार मिळू शकतो. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये हिन्दुस्तान झिंक कंपनीचा EBITDA 25 टक्के आणि ॲल्युमिनियम व्यवसाय 50 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. यासह तेल व्यवसायाचा EBITDA 40 टक्के कमी होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x