23 November 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Bondada Share Price | कुबेर खजिना आहे हा शेअर! अवघ्या 11 महिन्यात 3800% परतावा दिला, खरेदी करणार?

Bondada Share Price

Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 2966.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )

या कंपनीचा IPO 75 रुपये किमतीवर लाँच झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3049.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती. आता हा स्टॉक 3000 रुपये किमतीवर पोहचला आहे.

बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीचा IPO 18 ऑगस्ट 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. 30 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 142.50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंग झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. 26 जुलै 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 2966.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6408 कोटी रुपये आहे.

2024 या वर्षात बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 611 टक्के वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 417.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 343 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO 112 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 100.05 पट सबस्क्राइब झाला होता. तसेच इतर वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 115.46 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

Bondada Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x