23 November 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. ग्लोबल विंड एनर्जी काऊन्सिलच्या मते, 2032 पर्यंत भारताची स्थापित पवन ऊर्जा क्षमता 122GW पर्यंत पोहोचेल. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

याशिवाय भारत सरकारने 2027 पर्यंत प्रतिवर्षी 10GW क्षमतेच्या विशेष पवन ऊर्जा निविदा काढण्याची योजना आखली आहे. हे सुझलॉन एनर्जी सारख्या पवन उर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या OEM साठी अपसायकलचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, 2024-26 या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचा एकत्रित महसूल 53 टक्के CAGR ने वाढू शकतो. तसेच कंपनीच्या विंड टर्बाइन जनरेटर विभागातील महसुलात 72 टक्के CAGR वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सुझलॉन एनर्जी स्टॉक मागील आठवड्यात शुक्रवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 62.99 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85,500 कोटी रुपये आहे. मागील 15 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 17.43 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 265 टक्के वाढला आहे.

2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 65 टक्क्यांनी वधारला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे सुधारित धोरण, उत्तम कार्य-शक्ती, व्यवस्थापनातील खर्च ऑप्टिमायझेशन आणि कमोडिटीच्या किमतींचा चांगला पास-थ्रू यामुळे WTG मार्जिन 2024 मध्ये 2 टक्क्यांवरून 2026 पर्यंत 7 टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे.

जून 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा तिप्पट वाढीसह 302 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 2,016 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, ज्यात वार्षिक आधारावर 50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA 86 टक्क्यांनी वाढून 370 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 199 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा एबिटा मार्जिन 14.8 टक्क्यांवरून वाढून 18.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचा ताळेबंद 120 कोटी रुपये निव्वळ रोख स्थितीसह मजबूत आहे. याच पार्श्वभूमीवर तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 73 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शियल फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 71 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तर आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 64 रुपये आणि नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने 69 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 29 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x