23 November 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार! स्टॉकला या प्राईसवर सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन आठवड्यांपासून संमिश्र कल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 180-182 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. सलग 9 दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी आयआरएफसी स्टॉक 6 टक्के वाढीसह 195.20 रुपये किमतीवर पोहचला होता. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

1986 साली स्थापन झालेली आयआरएफसी ही कंपनी भारतीय रेल्वेची समर्पित वित्तीय शाखा आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.51 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 195.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ आयआरएफसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांनी गुंतवणुकदारांना आयआरएफसी स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, या शेअरची सपोर्ट लेव्हल 180-182 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक आपल्या सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 209 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयआरएफसी कंपनीने 26645 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच काळात कंपनीने 6412 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

2023-24 मध्ये आयआरएफसी कंपनीची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS 4.91 रुपये होता. मागील काही वर्षांत आयआरएफसी स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा देणारा सरकारी स्टॉक म्हणून नावारूपाला आला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 461 टक्के वाढवले आहेत. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 760 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x