23 November 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर प्राईस 1294 रुपयांची पातळी ओलांडणार

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1179.05 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. नुकताच या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात मजबूत वाढू शकतो. मागील एका आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 1,155.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म नोमुराच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काही दिवसात 1294 रुपये किमतीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात बीएसई सेन्सेक्स फक्त 13 टक्क्यांनी वाढला आहे.

टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी सप्टेंबर 2024 मध्ये तामिळनाडू राज्यात जग्वार लँड रोव्हर उत्पादन युनिट उभारण्यास सुरुवात करणार आहे. भारतात पहिल्यांदाच ही लक्झरी वाहने उत्पादन केली जाणार आहेत. हा प्लांट 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्स कंपनी या प्लांटद्वारे थेट 5000 लोकांना रोजगार प्रदान करणार आहे. टाटा मोटर्स ही कंपनी भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी आहे. ही कंपनी कार, युटिलिटी वाहने, ट्रक, बस आणि संरक्षण वाहने तयार करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने 2008 मध्ये ब्रिटीश कार ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x