23 November 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

NTPC Share Price | NTPC शेअर खरेदीचा जेफरीजचा सल्ला, स्टॉक प्राईस 450 रुपयांची लेव्हल ओलांडणार

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 412.6 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी सुरूच ठेवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )

अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या तज्ञांच्या मते, एनटीपीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 450 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.71 टक्के वाढीसह 413.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जेफरीज फर्मचा विश्वास आहे की, एनटीपीसी या पीएसयू कंपनीच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीची कमाई कामगिरी पूर्वीपेक्षा अधिक सुधारली आहे. याशिवाय कंपनीने 9.6 GW औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे. तज्ञांच्या मते, एनटीपीसी स्टॉकचा इक्विटीवरील विनियमित परतावा 2025 ते 2029 दरम्यान 15.5 टक्के राहू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 167 टक्क्यांनी वाढली आहे.

जून 2024 तिमाहीत एनटीपीसी कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 11 टक्क्यांच्या वाढीसह 4510.98 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून 2024 तिमाहीत या कंपनीचे ऑपरेशनल महसूल 44419.52 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑपरेशनल महसूल संकलनात 13.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. NTPC कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 3.25 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x