20 September 2024 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

RVNL Share Price | फायद्याची अपडेट आली! 1900% परतावा देणारा RVNL शेअर खरेदी करा, मोठी कमाई होणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 3.3 टक्के वाढीसह 626.65 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.11 टक्के वाढीसह 601.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 739.07 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळने राज्यातील वितरण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आरव्हीएनएल कंपनीसोबत 739.07 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. या कराराची पूर्तता करण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीला 2 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशच्या मध्य विभागातील वितरण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आरव्हीएनएल कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. त्यामुळे कंपनीला ही ऑर्डर देण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने 8 ऑगस्ट रोजी जून तिमाहीचे निकाल मंजूर करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. मागील दोन वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1900 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1980 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 410 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 95 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x