23 November 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी 'HOLD' रेटिंग, ब्रेकआउट देताच 'या' स्टॉक प्राईसला स्पर्श करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 68.25 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करत आहे. जून तिमाहीत या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स 25 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.72 टक्के वाढीसह 69.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 302 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 101 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 200 टक्के वाढ झाली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने जून तिमाहीमध्ये 2,016 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,348 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर या कंपनीच्या महसूल संकलनात 50 टक्के वाढ झाली आहे.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 70 रुपये किंमत पार करू शकतो. मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 73.5 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकमध्ये आणखी तेजी निर्माण होण्यासाठी मजबूत ब्रेकआउट होणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकने 55 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x