20 September 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

NTPC Share Price | तज्ज्ञांकडून NTPC शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 458 रुपयांना स्पर्श करणार

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 417.40 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक किंचित तेजीसह व्यवहार करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.05 लाख कोटी रुपये आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने शानदार कामगिरी केल्याने अनेक ब्रोकरेज कंपन्या एनटीपीसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )

तथापि काही तज्ञांनी हा स्टॉकवर ‘विक’ रेटिंग देऊन 30 टक्के घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 418.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत एनटीपीसी कंपनीचा स्टँडअलोन ऍडजस्टेड PAT 14 टक्क्यांच्या वाढीसह 4,200 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

वार्षिक आधारावर कंपनीचा PAT 12 टक्क्यांनी वाढून 21,300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, कारण या कंपनीच्या नफ्यात उपकंपन्या आणि JV च्या कमाईचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 458 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत कंपनीची स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमता 3.5 टक्क्यांनी वाढली असून वीज उत्पादन 11 टक्क्यांनी वाढले आहे.

कंपनीच्या कोळसा प्लांटचा PLF वार्षिक आधारावर 80 टक्क्यांनी वाढला आहे. एनटीपीसी कंपनीने 76 GW च्या एकत्रित ऊर्जा क्षमतेसह जून तिमाहीची क्लोजिंग केली आहे. सध्या एनटीपीसी कंपनीकडे 21 GW निर्माणाधीन क्षमता असून त्यातील 54 टक्के जलविद्युत आणि नवीकरणीय ऊर्जा आहे. हे प्रकल्प 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

2024-25 मधे कंपनीचा EPS 14 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तज्ञांनी एनटीपीसी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 458 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. एनटीपीसी कंपनीचे शेअर्स कोविड-19 मधील नीचांकी किमतीवरून 425 टक्क्यांनी वाढले आहेत. 2024 या वर्षात हा सरकारी स्टॉक 35 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

जेएम फायनान्शिअल फर्मच्या तज्ञांच्या मते, एनटीपीसी कंपनीची कोळशावर चालणाऱ्या संयंत्रांची प्लांट लोड फॅक्टर 80.39 टक्के असून राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सरासरी 76.19 टक्के आहे. अणुऊर्जा आणि कोळसा खाणकामातील व्यवसायाची गती लक्षात घेता, तज्ञांनी एनटीपीसी स्टॉकवर 451 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

एनटीपीसी कंपनीकडे सध्या 9.6 GW थर्मल आणि 9.2 GW नूतनीकरणक्षम, 2.2 GW जल क्षमता निर्माणाधीन क्षमता आहे. एनटीपीसी कंपनी नियोजनाच्या विविध टप्प्यांतर्गत आणखी 26 GW क्षमतेसह अणुऊर्जा निर्मितीमध्ये संधी शोधत आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी, एनटीपीसी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 467 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जेफरीज फर्मने देखील एनटीपीसी स्टॉकवर ‘बाय’ कायम ठेवली आहे. या फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 465 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 01 August 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x