23 November 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Penny Stocks | शेअर प्राईस 29 रुपये! स्टॉकची जोरदार खरेदी सुरु, रोज अप्पर सर्किट हिट

Penny Stocks

Penny Stocks | एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.17 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जून तिमाहीतील शानदार कामगिरीमुळे तेजी पाहायला मिळत आहे. तसेच FII ने या कंपनीतील आपला वाटा 0.04 टक्क्यांवरून वाढवून 0.19 टक्क्यांवर नेला आहे. ( एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी अंश )

जून तिमाहीत FII ने एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड कंपनीचे 71,252 नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 133.81 कोटी रुपये आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 29.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च 2024 तिमाहीत एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड कंपनीने 3.94 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीला 0.99 कोटी रुपये ऑपरेटिंग तोटा सहन करावा लागला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 5.14 कोटी रुपये नोंदवला गेला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 30.01 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याकाळात कंपनीचा ऑपरेटिंग नफा 16.23 कोटी नोंदवला गेला होता. मात्र कंपनीला 2.17 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या प्रवर्तकांकडे एकूण 58.14 टक्के भागभांडवल आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 41.66 टक्के भागभांडवल धारण केले आहे. FII ने या कंपनीचे 0.19 टक्के भागभांडवल धारण केले आहे. 1995 साली स्थापन झालेली एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड वीज उत्पादन आणि घाऊक वीज विक्री तसेच पॉवर उपकरणांच्या व्यापारात एक्स्पर्ट मानली जाते. ही कंपनी वीज निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, पूल बांधकाम आणि जलविद्युत प्रकल्प आणि सल्लागार सेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करते. तसेच ही कंपनी स्वतःच्या पॉवर प्लांटमध्ये जल विद्युत आणि पवन ऊर्जा निर्माण करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Energy Development Share Price BSE Live 01 August 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(543)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x