20 September 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Ashok Leyland Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलैंड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के घसरणीसह 258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलैंड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने अशोक लेलैंड स्टॉकवर ‘टॅक्टिकल बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच तज्ञांनी शेअर हुशारीने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी अशोक लेलैंड स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 248.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मने अशोक लेलँड स्टॉकवर 284 रुपये टार्गेट प्राइस देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची रेटिंग ‘ओव्हरवेट’ केली आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मला व्यावसायिक वाहन क्षेत्र केवळ मार्जिन सुधारणेवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे सौम्य घट अनुभवण्याची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की वाढती महागाई, ऑटोमोबाईल व्यवसायातील वाढ यासारख्या घटकामुळे वाहन कंपन्यांचा मार्जिन वाढेल. जुलै 2024 मध्ये अशोक लेलैंड कंपनीची विक्री आठ टक्क्यांनी घसरून 13928 युनिट झाली आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीची विक्री 15,068 युनिट होती.

जुलै 2024 मध्ये अशोक लेलैंड कंपनीची देशांतर्गत बाजारातील विक्री नऊ टक्क्यांनी घसरून 12,926 युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच महिन्यात हे प्रमाण 14,207 युनिट्स होते. अशोक लेलैंड कंपनीची देशांतर्गत बाजारातील मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांची विक्री 14 टक्क्यांच्या घसरणीसह 7,685 युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण 8,974 युनिट्स होते. अशोक लेलैंड कंपनीची देशांतर्गत बाजारातील हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री जुलै महिन्यात 5,241 युनिट्स होती. हेच प्रमाण जुलै 2023 मध्ये 5,233 युनिट होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x