22 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Vikas Ecotech Share Price | 4 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 रुपयेपेक्षा कमी आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 4.50 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( विकास इकोटेक कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.80 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी विकास इकोटेक स्टॉक 2.23 टक्के वाढीसह 4.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून 2024 तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 10.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 550 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत कंपनीने 1.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीच्या तुलनेत विकास इकोटेक कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 2.06 कोटी रुपये नफा कमावला होता. याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 93 कोटी रुपयेपेक्षा जास्त नोंदवले गेले होते.

एप्रिल-जून 2024 तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 93.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. विकास इकोटेक कंपनीच्या एकूण उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत 60 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 58.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील एका वर्षात विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 4.50 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 720 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x