22 November 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर पुन्हा तेजीत, 1 वर्षात दिला 284% परतावा, पुढे किती फायदा?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी हा स्टॉक 4 टक्के घसरणीसह 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा पेनी स्टॉक 75 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 3.33 टक्के भागभांडवल म्हणजेच 42,61,77,058 शेअर्स धारण केले आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 4.73 टक्के वाढीसह 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये फक्त एलआयसीच नाही तर अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी देखील मोठी गुंतवणूक केली आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 44 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 284 टक्के वाढवले आहेत. 2024 या वर्षात हा शेअर 75 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. मागील 5 वर्षात जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 330 टक्के नफा कमावून दिला आहे.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,534.81 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 0.70 रुपये होती. जीटीएल इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे सामायिक केलेले टेलिकॉम टॉवर आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापित करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीकडे भारतातील 22 दूरसंचार मंडळामध्ये अंदाजे 26,000 टॉवर्सचा पोर्टफोलिओ आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x