19 September 2024 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

GMP IPO | आला रे आला IPO आला! गुंतवणुकीची संधी सोडू नका, झटपट मिळेल मोठा परतावा

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच फर्स्टक्राय या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची पेरेंट कंपनी Brainbees Solutions Limited आपला IPO लाँच करणार आहे. ( ब्रेनबिझ सोल्युशन्स कंपनी अंश )

या कंपनीचा IPO 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदार या IPO मध्ये 5 ऑगस्ट रोजी गुंतवणूक करू शकतात. या कंपनीने आपल्या IPO ची किंमत बँड 440-465 रुपये निश्चित केली आहे.

पुणेस्थित ब्रेनबिझ सोल्युशन्स कंपनीच्या प्रस्तावित IPO इश्यूमध्ये 1,666 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स आणि 5.44 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 4,156.52 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या कंपनीची फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या अनुक्रमे 220 पट आणि 232.50 पट आहे. या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 32 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत.

फर्स्टक्राय या कंपनीमध्ये रतन टाटा आपले 77,900 शेअर्स विकणार आहेत. रतन टाटा यांनी फर्स्टक्राय कंपनीचे 0.02 टक्के शेअर्स प्राधान्य आधारावर 84.72 रुपये किमतीवर खरेदी केले होते. त्यांचे एकूण मुल्य 66 लाख रूपये होते. ब्रेनबीज सोल्यूशन्स कंपनीने IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टैनले इंडिया कंपनी, बोफा सिक्युरिटीज इंडिया, जेएम फायनान्शियल आणि अॅव्हेंडस कॅपिटल यांना नियुक्त केले आहे. तसेच Link Intime India ला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या कंपनीचे शेअर्स 13 ऑगस्ट रोजी BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचिबद्ध केले जातील. ब्रेनबीज सोल्युशन्स ही कंपनी मुख्यतः 12 वर्षांखालील मुलांसाठी सर्व आवश्यक गोष्टी ऑनलाईन विकते. ही कंपनी कपडे, शूज, बेबी गियर, नर्सरी, डायपर, खेळणी यासारखी उत्पादने विकते. या कंपनीकडे मॉम्स, बेबी आणि लहान मुलांसाठी 1.5 दशलक्ष SKU आहेत. तसेच कंपनीच्या मल्टीचॅनल प्लॅटफॉर्मवर 7,500 हून अधिक ब्रँड्स सामील आहेत.

31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी ब्रेनबिझ सोल्युशन्स कंपनीने 6,575.08 कोटी रुपये महसुलावर 321.51 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. 2022-23 आर्थिक वर्षासाठी ब्रेनबीज सोल्यूशन्स कंपनीचा निव्वळ तोटा 5,731.28 कोटी रुपये महसुलावर 486.06 कोटी रुपये होता. ही कंपनी IPO मधून उभारलेल्या निधीचा वापर ‘बेबीहग’ ब्रँड अंतर्गत नवीन आधुनिक स्टोअर्स आणि गोदाम सुरू करण्यासाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMP IPO of Brainbees Solutions Ltd 02 August 2024.

हॅशटॅग्स

#GMP IPO(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x