22 November 2024 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

BHEL Share Price | BHEL शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये 40% कमाईची संधी, मालामाल करणार हा स्टॉक

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि अवजड उत्पादन कंपनी आहे. या कंपनीला भारत सरकारने महारत्न दर्जा बहाल केला आहे. ही कंपनी 180 पेक्षा जास्त उत्पादने तयार करते. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, पॉवर निर्मिती, दूरसंचार आणि औद्योगिक वाहतूक क्षेत्र यासारख्या क्षेत्रांची उपकरणांच्या गरजांची पूर्तता करते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 301.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामाने बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील अंतर्गत वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने औष्णिक उर्जेकडे लक्ष वळवले आहे. पुढील काही वर्षांत भारतात 35-40GW क्षमतेचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू होतील. यामधे BHEL कंपनी सर्वात मोठी लाभार्थी असेल. दरवर्षी या कंपनीला 8-9 GW ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत बीएचईएल कंपनीला 4.8GW क्षमतेच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या आर्थिक वर्षात 10-12GW क्षमतेच्या औष्णिक प्रकल्पांसाठी नवीन निविदा काढल्या जातील. यातून बीएचईएल कंपनीला मोठ्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ञांच्या मते बीएचईएल स्टॉक पुढील काळात 425 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक 35-40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

जून तिमाहीत बीएचईएल कंपनीला 212 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाहीत बीएचईएल कंपनीला 205 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च तिमाहीत या कंपनीला 489 कोटी रुपये नफा झाला होता. या कंपनीचा एकत्रित महसूल 5484.92 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी कंपनीचा महसूल 5003.43 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत या कंपनीचा EBITDA 169 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत 179 कोटी रुपये होता.

9 जुलै रोजी बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने 335 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 390 रुपये होती. 2024 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 200 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x