25 November 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News
x

Tata Mutual Fund | पगारदारांनो! टाटा तिथे नो घाटा, या फंडात डोळे झाकून पैसे गुंतवा, मिळेल 1.04 कोटी परतावा

Tata Mutual Fund

Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाला तुम्ही ‘करोडपती’ बनवणारी योजना देखील म्हणू शकता. कारण टाटा म्युच्युअल फंडाच्या या योजनेत सुरुवातीपासूनच एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 8500 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल.

ही योजना सुरू झाल्यापासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी 15.61 टक्के दराने वार्षिक परतावा देत आहे. टाटा म्युच्युअल फंडाच्या या योजनेत एसआयपी करणाऱ्यांना 19 वर्षांत त्यांच्या गुंतवणुकीवर सुमारे 5.37 पट परतावा मिळाला आहे.

काय आहे टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची योग्यता
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंड आहे जो आपल्या गुंतवणुकीपैकी किमान 80 टक्के गुंतवणूक पायाभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये करतो. याशिवाय हा फंड त्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करतो, ज्यांना पायाभूत सुविधांच्या विकासामुळे फायदा होण्याची शक्यता आहे.

टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने कसे बनवले ‘करोडपती’
टाटा म्युच्युअल फंडाच्या या योजनेने सुरुवातीपासून नियमित गुंतवणूकदारांना कसे समृद्ध केले आहे, हे आपण खालील गणितावरून समजू शकता.

टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड (रेग्युलर प्लॅन)
* मासिक एसआयपी : 8500 रुपये
* 19 वर्षात एसआयपीच्या माध्यमातून एकूण गुंतवणूक : 19.38 लाख रुपये
* एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य : 1,04,17,656 रुपये (1.04 कोटी रुपये)
* 19 वर्षांत एसआयपीवरील वार्षिक परतावा : 15.61%
* व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम): 2,525.37 कोटी रुपये

टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड रिटर्न हिस्ट्री
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने गेल्या 3, 5 आणि 10 वर्षांत एसआयपीवर उत्तम परतावा दिला आहे. तुलना सुलभतेसाठी सर्व गणिते 8500 रुपयांच्या मासिक एसआयपीच्या आधारे देण्यात आली आहेत.

Tata Infrastructure Fund (Regular Plan)

10 वर्षांत परतावा
* 10 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीद्वारे एकूण गुंतवणूक : 10.20 लाख रुपये
* 10 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य : 33.64 लाख रुपये
* 10 वर्षात एसआयपीवरील वार्षिक परतावा : 22.59%

5 वर्षांत परतावा
* 5 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीद्वारे एकूण गुंतवणूक : 5.10 लाख रुपये
* 5 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य : 12.76 लाख रुपये
* 5 वर्षात एसआयपीवरील परतावा : 37.72%

3 वर्षांत परतावा
* 3 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीद्वारे एकूण गुंतवणूक : 3.06 लाख रुपये
* 3 वर्षात 8500 रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य : 5,46,159 रुपये
* 3 वर्षात एसआयपीवरील परतावा : 41.51%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Mutual Fund Infrastructure Fund NAV Today 07 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x