23 November 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Alok Industries Share Price | 25 रुपयाचा रिलायन्स ग्रुपचा स्वस्त शेअर अजून घसरणार? BUY करावा की SELL?

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | भारतीय सीमेला लागुन असलेल्या बांग्लादेशमध्ये सध्या राजकीय हाहाकार पाहायला मिळत आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पळ काढला आहे. दरम्यान बांग्लादेशमध्ये उसळलेल्या दांग्यामुळे भारतीय आणि बांग्लादेश यांच्यात होणाऱ्या व्यापारावर नकारात्मक परिमाण पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी यांच्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या व्यापारावर देखील याचा थेट परिमाण पाहायला मिळत आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

कारण बांग्लादेशमधील कापड उद्योग जगातील सर्वात मोठ्या कापड उद्योगांपैकी एक आहे. बांग्लादेशात तयार केले जाणारे कापड भारतासहित जगभर निर्यात केले जातात. मात्र आता या व्यवसायावर नकारात्मक परिमाण पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.61 टक्के घसरणीसह 25.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत आणि बांगलादेशमधील निर्यात व्यवसाय 2022-23 या आर्थिक वर्षात 12.21 बिलियन डॉलर्सवरून 2023-24 मध्ये 11 बिलियन डॉलर्सवर आला होता. भारताच्या मुख्य निर्यातीत भाज्या, कॉफी, चहा, मसाले, साखर, शुद्ध पेट्रोलियम तेल, रसायने, कापूस, लोखंड आणि पोलाद आणि वाहने इत्यादींचा समावेश आहे. भारतातर्फे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मासे, प्लास्टिक, चामडे आणि कपडे यासारखे वस्तू सामील आहेत.

मागील एका वर्षात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 39.24 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,571.99 कोटी रुपये आहे.

आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेली कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान आलोक इंडस्ट्रीज कंपनी ताब्यात घेतली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 09 August 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x