12 December 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत सकारात्मक संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीने शुक्रवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या कमाईमध्ये 13.4 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत आयआरबी इन्फ्रा कंपनीने 1,852.9 कोटी रुपये कमाई केली आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )

मागील वर्षी याच कालावधीत आयआरबी इन्फ्रा कंपनीची कमाई 1,634.2 कोटी रुपये होती. या काळात कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 4.7 टक्के वाढून 140 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचा EBITDA मागील वर्षीच्या तुलनेत 10.2 टक्के वाढून 857 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 2.57 टक्के घसरणीसह 62.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयआरबी इन्फ्रा कंपनीचा EBITDA मार्जिन वार्षिक आधारावर 47.6 टक्केवरून 46.25 टक्के झाला आहे. जून तिमाहीमध्ये या कंपनीचे टोल संकलन मागील वर्षीच्या तुलनेत 32 टक्के वाढून 1,556 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. एकूण जमा टोल महसुलात FASTag द्वारे गोळा केलेल्या टोलचा वाटा 96 टक्के आहे. या कंपनीच्या BOT/TOT प्रकल्प विभागातील महसूल 585.5 कोटींवरून वाढून 613.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या बांधकाम विभागाचा महसूल वार्षिक आधारावर 1,042 कोटी रुपयेवरून वाढून 1,233 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

IRB इन्फ्रा कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “भारताच्या जीडीपीच्या मजबूत अंदाजानुसार सरकार पीपीपी प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. यासह आयआरबी इन्फ्रा कंपनीला महामार्ग विकास क्षेत्रातील आगामी संधी, मजबूत आर्थिक वाढ आणि अंमलबजावणी क्षमतेसह, आणखी कमाई करण्यास वाव आहे.” 2024 या वर्षात आयआरबी इन्फ्रा स्टॉक आतापर्यंत 50 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.5 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 10 August 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x