19 September 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

SJVN Share Price | SJVN शेअर्स खरेदी करा, फायद्याची मोठी अपडेट आली, पुढे किती परतावा मिळेल?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 142.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीत व्यवहार करतोय. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

नुकताच एसजेव्हीएन कंपनीने मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात 90 MW क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या कामगिरीसह एसजेव्हीएन कंपनीची एकूण स्थापित क्षमता 2,466.50 मेगावॅटवर पोहचली आहे. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.34 टक्के वाढीसह 141.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एसजेव्हीएन कंपनीद्वारे उभारला जाणारा प्रकल्प कंपनीला फ्लोटिंग सोलर एनर्जी सेक्टरमध्ये प्रवेश करण्याची संधी देत आहे. 90 मेगावॅट क्षमतेचा ओंकारेश्वर फ्लोटिंग सौर प्रकल्प 646.20 कोटी रुपये गुंतवणूक करून बांधण्यात आला आहे. सुरुवातीच्या वर्षात या प्रोजेक्टमधून 196.5 दशलक्ष युनिट आणि 25 वर्षांमध्ये 4,629.3 दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती होण्याचा अंदाज आहे. या उपक्रमामुळे एसजेव्हीएन कंपनीच्या महसुल संकलनात अतिरिक्त 64 कोटी रुपये वाढ होणे अपेक्षित आहे.

एसजेव्हीएन कंपनीकडे सध्या 56,802.40 MW क्षमतेचा एक मोठा पोर्टफोलिओ आहे, ज्यात हायड्रो पॉवर, पंप्ड स्टोरेज, थर्मल आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प सामील आहेत. 13 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपली पूर्ण मालकीची उपकंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये निर्गुंतवणुकीद्वारे भांडवल उभारणी करण्यावर चर्चा करणार आहेत.

एसजेव्हीएन कंपनी 2030 पर्यंत 25,000 MW आणि 2040 पर्यंत 50,000 MW ऊर्जा निर्मितीचे सामायिक दृष्टीकोन साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. एलआयसी कंपनीने देखील एसजेव्हीएन स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एलआयसीने एसजेव्हीएन कंपनीचे 2.26 टक्के म्हणजेच 8,89,94,881 शेअर्स धारण केले आहे. तसेच FII आणि DII ने मार्च 2024 च्या तुलनेत जून 2024 मध्ये आपला वाटा वाढवला आहे. एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम लिमिटेड ही कंपनी जलविद्युत निर्मिती आणि पारेषण व्यवसाय गुंतलेली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,000 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 12 August 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x