15 January 2025 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक 'BUY' करावा की SELL?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. जून तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक चर्चेत आला होता. मागील आठवड्यात गुरुवारी या बँकेचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून तिमाहीत येस बँकेने 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( येस बँक अंश )

मागील वर्षीच्या याच तिमाहीत येस बँकेने 342.5 कोटी रुपये नफा कमावला होता, ज्यात वार्षिक आधारावर 46 टक्के वाढ झाली आहे. येस बँकेचे व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 12.2 टक्क्यांनी वाढून 2244 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचे उत्पन्न 2,000 कोटी रुपये नोंदवले गेले होते. जून तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2,153 कोटी रुपयेवरून 4.2 टक्क्यांनी वाढले आहे. 30 जून 2024 पर्यंत या बँकेचे एकूण नॉन परफॉर्मिंग अॅसेट प्रमाण 1.7 टक्के नोंदवले गेले होते, तर निव्वळ एनपीए 0.5 टक्के नोंदवला गेला होता. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.082 टक्के वाढीसह 24.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2024 या वर्षात येस बँक स्टॉक 43 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. YTD आधारे या बँकेचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील आठ महिन्यांपैकी एकूण पाच महिन्यांत या स्टॉकने सकारात्मक परतावा दिला आहे. ऑगस्टमध्ये येस बँक स्टॉक सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे. जुलैमध्ये हा स्टॉक 12 टक्के आणि जूनमध्ये 3 टक्के वाढला होता. एप्रिलमध्ये येस बँक स्टॉक 12.7 टक्क्यांनी आणि मेमध्ये 12 टक्क्यांनी वाढला होता. जानेवारी 2024 मध्ये येस बँक स्टॉक 12 टक्के वाढला होता.

9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. आता हा स्टॉक उच्चांक किमतीवरून 27 टक्क्यांनी खाली आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी येस बँक स्टॉक 14.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत या बँकेचे शेअर्स 101 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 74 टक्के घसरली आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक 19 रुपये किमतीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉक 20 रुपये किमतीवर घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ICICI सिक्युरिटीजच्या मते, येस बँकेचा निव्वळ व्याज मार्जिन आणि मालमत्तेवर परतावा तिमाही-दर- तिमाही आधारावर स्थिर आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने येस बँक स्टॉकला न्यूट्रल रेटिंग देऊन 17 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x