20 September 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | एशो-आरामात जाईल रिटायरमेंटनंतरचं आयुष्य, SBI बँकेची खास स्कीम देईल मोठा परतावा Aditi Rao Hydari | अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नात 'तो' फोटो घेण्यासाठी करावे लागले होते चांगलेच कष्ट, शेअर केला अनुभव Kangana Ranaut | पाकिस्तानमध्ये देखील बॉलीवूड स्टार 'कंगना रनौतची' हवा, महिलेने काढलाय हुबेहूब कंगनासारखा आवाज HDFC Mutual Fund | पगारदारांनो, महिना 800 रुपये SIP बचत करा, मिळेल 1,12,53,528 रुपये मॅच्युरिटी रक्कम - Marathi News L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
x

Sakuma Share Price | शेअर प्राईस 9 रुपये! रोज अप्पर सर्किट हीट, कमाईची संधी सोडू नका

Sakuma Share Price

Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढून 9.31 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2.97 रुपये होती. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )

शुक्रवारी सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 7.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1459.55 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक 4.84 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नुकताच सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत दिले आहेत. बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने 9 ऑगस्ट 2024 हा दिवस निश्चित केला होता. जून 2024 तिमाहीत प्रवर्तकांनी कंपनीचे 46.29 टक्के भागभांडवल धारण केले आहे. मार्च 2024 तिमाहीत हे प्रमाण 61.88 टक्के होते. सार्वजनिक गुंतवणूकदारांचा सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीतील वाटा 38.12 टक्क्यांवरून वाढून 53.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सकुमा एक्स्पोर्ट्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः आंतरराष्ट्रीय व्यापार, पेट्रोकेमिकल्स, पेट्रोलियम आणि खनिजे, अक्षय ऊर्जा आणि वितरण आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रात व्यवसाय करते. सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी साखर, खाद्यतेल, तेलबिया, कडधान्ये, कापूस आणि अनेक विशेष पिकांची खरेदीदार, प्रोसेसर, मार्केटर, निर्यातदार आणि आयातदार म्हणून व्यवसाय करते. मार्च 2024 च्या तिमाहीत या कंपनीने निव्वळ नफ्यात 157.21 टक्के वाढ नोंदवली होती. तर याच तिमाहीत कंपनीच्या महसुलात 50.19 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sakuma Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

Sakuma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x