25 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

RVNL Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, RVNL बाबत फायद्याची अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. या रेल्वे कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा 600 रुपये किमतीच्या टप्पा ओलांडला आहे. त्यांनतर हा स्टॉक पुन्हा घसरला. आज देखील आरव्हीएनएल स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मंगळवारी आरव्हीएनएल स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 601.75 रुपये किमतीवर पोहचला होता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 700 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 561.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच आरव्हीएनएल स्टॉकला MSCI इंडिया इंडेक्समध्ये सामील करण्यात आले आहे. MSCI ने दिलेल्या माहितीनुसार रेल विकास निगम लिमिटेड, व्होडाफोन आयडिया, डिक्सन टेक्नॉलॉजीज, ऑइल इंडिया, ओरॅकल फायनान्शिअल, प्रेस्टीज इस्टेट्स आणि Zydus Lifesciences यांना MSCI इंडिया निर्देशांकात सामील केले जाणार आहेत. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मनुसार रेल विकास निगम लिमिटेड कंपनी पुढील काळात 219 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक आकर्षित करू शकते.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काळात आरव्हीएनएल स्टॉक 700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 125.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 601.75 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 140 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. याकाळात हा स्टॉक 245.60 रुपयेवरून वाढून 600 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 122.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x