25 November 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत
x

राष्ट्रवादी व शरद पवारांनी आत्मचिंतन करावं – मुख्यमंत्री

CM Devendra Fadanvis, Chief minister Devendra Fadanvis, NCP, BJP Maharashtra, Sharad Pawar, Ajit Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसंच सरकारवर जोरदार टीका देखील केली. या टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजप सरकार कोणावरही दबाव टाकत नसून दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही.

शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे‘, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला आहे. तसेच ज्या नेत्यांची ईडी चौकशी करत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत, जे लोकांची कामे करतात त्यांनाच पक्षात घेतले जाईल, असेही फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना पवारांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे.

दबाव टाकून पक्षात घेण्या इतका आमच्याकडे वेळ नाही;
‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत आहे. दबाव टाकून पक्षांतर केले जात आहे‘, असा आरोप पवारांनी केल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक आहेत. मात्र, ज्यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे, अशांना आम्ही घेणार नाही. कुणावर दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही. तसेच भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही‘, असे म्हणत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x