25 November 2024 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Rattanindia Enterprises Share Price | फायदा घ्या! रॉकेट स्पीडने परतावा देतोय हा स्वस्त शेअर, यापूर्वी दिला 1500% परतावा

Rattanindia Enterprises Share Price

Rattanindia Enterprises Share Price | रतन इंडिया इंटरप्राईसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 89.13 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक जबरदस्त तेजीत धावत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीचे शानदार निकाल जाहीर केले आहेत. ( रतन इंडिया इंटरप्राईसेस कंपनी अंश )

जून तिमाहीत या कंपनीने 378 टक्के वाढीसह 851.25 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी रतन इंडिया इंटरप्राईसेस स्टॉक 4.51 टक्के वाढीसह 84.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाही निकालांनुसार रतन इंडिया इंटरप्राईसेस कंपनीची निव्वळ विक्री 70 टक्क्यांनी वाढून 2,494.03 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर कंपनीचा निव्वळ नफा 378 टक्क्यांनी वाढून 851.25 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,017.45 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 5 वर्षाची वार्षिक सरासरी वाढ 120 टक्के आहे.

रतन इंडिया इंटरप्राईसेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 46.50 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 94.85 रुपये होती. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. रतन इंडिया इंटरप्राईसेस कंपनीच्या स्टॉकचा ROE 76 टक्के आणि ROCE 36 टक्के आहे. रतन इंडिया इंटरप्राईसेस ही कंपनी रतन इंडिया समूहाचा भाग आहे.

ही कंपनी मुख्यतः ई-कॉमर्स, इलेक्ट्रिक वाहने, फिनटेक आणि ड्रोनमधील तंत्रज्ञानावर आधारित नवीन- युगातील टेक्नॉलॉजी क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची ची ई-कॉमर्स शाखा, CocoBlue ही एक ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म आहे जी विविध ब्रँडसोबत भागीदारी करते. या कंपनीकडे स्वतःच्या D2C ब्रँडसह B2B ऑनलाइन फॅशन ब्रॅण्डसह विविध निओब्रँड्स देखील आहेत.

रतन इंडिया समूहाची फिनटेक उपकंपनी निओटेक लिमिटेड वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड ऑफर करणारा डिजिटल कर्ज देणारा प्लॅटफॉर्म ‘वेफिन’ चे संचालन करते. याव्यतिरिक्त निओस्की ही रतन इंडिया समूहाची ड्रोन उपकंपनी असून ती पायलट प्रशिक्षण कार्यक्रम आणि नवीन कार्गो संबंधित सेवा प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattanindia Enterprises Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

RattanIndia Enterprises Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x