24 November 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4997 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5860 रुपये होती. आता हा स्टॉक 5000 रुपये किमतीच्या खाली आला आहे. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतात. 7 ऑगस्ट रोजी या कंपनीच्या शेअर्सने 4542 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 4,985.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर RSI मध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या हा स्टॉक ओव्हरबॉट झोनच्या खूप खाली गेला आहे. अशा परिस्थितीत, शेअरमधे नकारात्मक धोका मर्यादित आहे. या कंपनीचा व्यावसायिक दृष्टीकोन मजबूत आहे. चांगल्या तिमाही कामगिरीचा स्टॉकवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 5790 रुपये ही पहिली टार्गेट प्राइस आणि 6300 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस स्पर्श करू शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25-26 टक्के अधिक वाढू शकतो. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक खरेदी करताना 4550 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

जून तिमाहीत माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने 9 टक्के वाढीसह 2357 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा EBITDA म्हणजेच ऑपरेटिंग नफा 404 कोटी रुपयेवरून दुप्पट वाढून 913 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. या कंपनीचा पीबीटी वार्षिक आधारावर 383 कोटी रुपयेवरून वाढून 889 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात 122 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने 696 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 314 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 16 टक्केवरून 26 टक्केवर गेला आहे. 30 जून 2024 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 36839 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

News Title| Mazagon Dock Share Price today on 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x