22 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, कमाईची मोठी संधी

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या टाटा स्टील स्टॉक 184.60 रुपये या आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील हा लार्जकॅप स्टॉक बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचा भाग आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.28 टक्क्यांच्या वाढीसह 149.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक आपल्या 100 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकला 155 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे.

टाटा स्टील कंपनीचा लाभांश उत्पन्न प्रमाण 2.41 टक्के आहे. जून 2024 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या स्टॉकवर 360 टक्के लाभांश वाटप केला होता. यावेळी टाटा स्टील कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 3.60 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये देखील टाटा स्टील कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक स्टॉकवर 51 रुपये लाभांश वाटप केला होता. 2021 आणि 2020 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना अनुक्रमे 25 रुपये आणि 10 रुपये लाभांश वाटप केला होता.

टाटा स्टील कंपनीने 2022 मध्ये आपले इक्विटी शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने जुलैमध्ये 10:1 या प्रमाणात आपले शेअर्स विभाजित केले होते. कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपयेच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले होते. 2022 मध्ये स्टॉक विभाजन झाल्यानंतर टाटा स्टील कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी 1 रुपयेच्या स्टॉकवर 720 टक्के लाभांश वाटप केला होता.

2024 मध्ये या कंपनीने आपल्या स्टॉकच्या दर्शनी किमतीवर 260 टक्के आणि 2023 मध्ये 360 टक्के लाभांश वाटप केला होता. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 114.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,86,689.89 कोटी रुपये आहे.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x