23 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Post Office Scheme | फायद्याची योजना, फक्त व्याजाचे रु.32,044 मिळतील, तर मॅच्युरिटी रक्कम रु.2,32,044 असेल

Post Office Scheme

Post Office Scheme | आता रक्षाबंधनाचा सण येणार आहे. या निमित्ताने इंडिया पोस्ट ऑफिसने देखील भारतातील सर्व महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सर्व महिलांना खाते उघडून गुंतवणूक करता येईल.

जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्ही पालकांच्या नावाने किंवा पालकांच्या देखरेखीखाली खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. एक वर्षानंतर, खातेदार त्याच्या खात्यातून एकूण ठेवीपैकी 40 टक्के रक्कम काढू शकतो.

या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुमच्या बहिणीसाठी देखील खाते उघडू शकता. खाते उघडताना, तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही या खात्यात किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता. हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, रहिवासी प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.

मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम
जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 1000 रुपये गुंतवणूक केली, तर तुम्हाला सहामाही आधारावर 7.5 टक्के व्याज परतावा मिळू शकतो. म्हणजेच परिपक्वतेवर तुम्हाला 1445 रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही या खत्यात दोन लाख रुपये दोन वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला 7.5 टक्के व्याजदराने एकूण 32,044 रुपये व्याज परतावा मिळेल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044 रुपये परत मिळतील. जर तुम्ही दोन वर्षांसाठी या खात्यात 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1,16,022 रुपये परतावा मिळेल.

News Title | Post Office Scheme 18 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x