22 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमविषयी चर्चा झाल्याची शक्यता

MNS, Maharashtra navnirman Sena, Raj Thackeray, MLA Jayant Patil, MLA Ajit Pawar, NCP, EVM, EVM Ballet Paper, EVM Hacking, EVM Hack, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाने हा विजय ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मिळवला असल्याची टीका होत आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकलेली नाही, पण येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष एल्गार करणार आहेत. त्या अनुषंगाने ही भेट झाल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आणखी काय चर्चा झाली? ते समजू शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केलेली दिसते आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ४ ऑगस्टला म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार याकडे प्रसार माध्यमांचं लक्ष लागून राहील आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x