26 April 2025 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL
x

RSS मुलांना देणार लष्करी प्रशिक्षण, लवकरचं सैनिकी स्कूल स्थापन करणार

RSS, Rashtriya Swayamsevak Sangh, Army, Army School, Mohan Bhagwat

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी यूपीत येथे सैनिकी स्कूल उघडणार आहे. यामध्ये मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

RSS कडून नेहमी राष्ट्रहितासाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आता लष्करी बळ वाढविण्यासाठी आणि लष्करात जाण्यास इच्छुक असणाऱ्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी संघ आता सैनिकी स्कूल उघणार आहे. RSSचे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचं नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे.

रिपोर्टनुसार, शाळेच्या निर्माणाचं कार्य सुरू करण्यात आंल आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये या शाळेत शिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mohan Bhagwat(8)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या