18 September 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 55% कमाई, संधी सोडू नका - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या - Marathi News Bigg Boss Marathi | निक्की-अरबाज बद्दल केला मोठा खुलासा म्हणाला, 'अख्या जगाला माहितीये ते सध्या काय करतायेत' Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
x

Reliance Infra Share Price | 1 महिन्यात दिला 35% परतावा, रिलायन्स इन्फ्रा शेअर तेजीत, पुढेही मोठी कमाई

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 240 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढून 237.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )

आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 1.33 टक्के वाढीसह 241.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जून तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा निव्वळ तोटा 69.47 कोटी रुपयेवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीला 494.83 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. रिलायन्स इन्फ्रा कंपनीने बुधवारी सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 7,256.21 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 5,645.32 कोटी रुपये कमाई केली होती. जून तिमाहीत या कंपनीचा खर्च वाढून 6,799.30 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा खर्च 6,372 कोटी रुपये नोंदवला गेला होता. रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांचा विकास, अभियांत्रिकी कामकाज आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

मागील एका महिन्यात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.70 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 13 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत 530 टक्के वाढली आहे.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x