19 September 2024 9:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Quant Mutual Fund | नोकरदारही होतील श्रीमंत! या 5 म्युचुअल फंड योजना 153% ते 377% पर्यंत परतावा देतील

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund | भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक आणि मिडकॅप म्युच्युअल फंड योजना नेहमीच गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात. मागील काही वर्षांत अनेक मिडकॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. मिडकॅप म्युचुअल फंडांनी मागील 5 वर्षांत गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर 377 टक्के आणि SIP गुंतवणुकीवर 153 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 5 म्युचुअल फंड स्कीम पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

क्वांट मिड कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेचे नाव परतावा देण्याच्याबाबत अग्रस्थानी आहे. 31 जुलै 2024 अखेर क्वांट मिडकॅप फंडाची एकूण मालमत्ता 9282.92 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर त्यांचे खर्चाचे प्रमाण 1.73 टक्के नोंदवले गेले होते. या म्युचुअल फंडाने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर 376.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. तसेच गेल्या 5 वर्षांमध्ये या म्युचुअल फंडाने SIP गुंतवणुकीवर 153 टक्के परतावा दिला आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 33.39 टक्के परतावा दिला आहे. तसेच या म्युचुअल फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर 322.94 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. या फंडने मागील 5 वर्षात SIP गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 39.09 टक्के परतावा दिला आहे. आणि SIP गुंतवणुकीवर 158.56 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. 31 जुलै 2024 रोजी मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाची एकूण मालमत्ता 14445.55 कोटी रुपये होती. तर त्यांचे खर्चाचे प्रमाण 1.69 टक्के होते.

PGIM India Midcap Opportunities Fund :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 31.03 टक्के परतावा दिला आहे. तसेच या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर लोकांना 286.78 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या म्युचुअल फंड योजनेने गुंतवणुकदाराना SIP गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 27.39 टक्के परतावा दिला आहे. तसेच 96.57 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. 31 जुलै 2024 अखेर PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची एकूण मालमत्ता 11268.06 कोटी रुपये होती.

महिंद्रा लाइफ मिड कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 30.53 टक्के परतावा दिला आहे. तसेच या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर लोकांना 279.50 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या म्युचुअल फंड योजनेने गुंतवणुकदाराना SIP गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 33.86 टक्के परतावा दिला आहे. तसेच 129.03 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. 31 जुलै 2024 अखेर PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची एकूण मालमत्ता 3165.98 कोटी रुपये होती.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 30.61 टक्के परतावा दिला आहे. तसेच या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर लोकांना 280.68 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या म्युचुअल फंड योजनेने गुंतवणुकदाराना SIP गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 34.19 टक्के परतावा दिला आहे. तसेच 130.82 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. 31 जुलै 2024 अखेर PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची एकूण मालमत्ता 32970.78 कोटी रुपये होती.

News Title | Quant Mutual Fund for investment 21 August 2024.

हॅशटॅग्स

quant mutual fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x