23 November 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI म्युच्युअल फंडाच्या या डोळे झाकुन पैसे गुंतवा, फक्त फायदाच फायदा होईल

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंड ही SBI म्युच्युअल फंडाची मल्टीबॅगर परतावा कमावून देणारी योजना आहे. या योजनेत 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केल्यास 5 वर्षांत 5 लाख रुपये परतावा मिळतो. ही म्युचुअल फंड योजना SBI म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक आहे. मागील 5 वर्षांत या स्कीमने अपफ्रंट गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 28.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर SBI म्युच्युअल फंडाच्या याच योजनेने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे 5 वर्षांत 33.77 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे.

SBI लाँग टर्म इक्विटी फंड परतावा (डायरेक्ट स्कीम)
* 5 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 5 वर्षांसाठी मासिक SIP : 1100 रुपये
* 5 वर्षात SIP द्वारे एकूण गुंतवणूक : 66 हजार रुपये
* 5 वर्षांत एकरकमी+SIP गुंतवणूक : 1.66 लाख रुपये
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा : 28.19 टक्के
* 5 वर्षांमध्ये मासिक SIP वर वार्षिक परतावा : 33.77 टक्के
* एकरकमी गुंतवणुकीचे एकूण फंड मूल्य+5 वर्षानंतर SIP परतावा : 501988 रुपये

SBI लाँग टर्म इक्विटी म्युचुअल फंड स्कीम 31 मार्च 1993 रोजी सुरू करण्यात आलेली एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम होती. ही योजना सुरू होऊन जवळपास 31 वर्ष झाले आहे. लाँच झाल्यापासून या योजनेने गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत गुंतवणुकीवर 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी लागू आहे. तसेच आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकदारांना कर लाभ देखील मिळतो. SBI म्युच्युअल फंड योजनेचे जुने नाव SBI मॅग्नम टॅक्सगेन होते. 17 फेब्रुवारी 2020 रोजी, या योजनेचे नाव बदलून SBI लाँग टर्म इक्विटी फंड करण्यात आले होते.

SBI लाँग टर्म इक्विटी फंड परतावा (नियमित योजनां)
* 1 वर्षात नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 57.55 टक्के
* 1 वर्षात थेट योजनेचा वार्षिक परतावा : 58.65 टक्के
* 3 वर्षात नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 28.99 टक्के
* 3 वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा: 29.85 टक्के
* 5 वर्षांमध्ये नियमित योजनेचा वार्षिक परतावा: 27.37 टक्के
* 5 वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा: 28.19 टक्के
* 10 वर्षांत नियमित योजनेचा वार्षिक परतावा: 16.27 टक्के
* 10 वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा: 17.01 टक्के
* लाँच झाल्यापासून नियमित योजनेचा वार्षिक परतावा: 17.51 टक्के
* लाँच झाल्यापासून थेट योजनेचा वार्षिक परतावा : 18.22 टक्के

SBI लाँग टर्म इक्विटी फंड पोर्टफोलिओतील एकूण मालमत्तेपैकी किमान 80 टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटी सारख्या साधनांमध्ये गुंतवली जाते. सध्या या फंडातील 92.63 टक्के वाटा इक्विटीमध्ये आणि 7.37 टक्के रोख साधनांमध्ये गुंतवण्यात आला आहे. या म्युचुअल फंडाची 69.03 टक्के इक्विटी होल्डिंग लार्ज कॅप कंपन्यांमध्ये आहे. तसेच 24.37 टक्के गुंतवणूक मिड कॅप शेअर्समध्ये आणि 6.61 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप शेअर्समध्ये लावण्यात आली आहे.

हा म्युचुअल फंड त्याच्या एकूण मालमत्तेच्या 20 टक्के रक्कम मनी मार्केट लावतो. या योजनेच्या खर्चाचे प्रमाण 1.61 टक्के असून थेट योजनेचे खर्चाचे प्रमाण 0.95 टक्के आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप 10 गुंतवणुकीमध्ये Ge T&D India, HDFC बँक, M&M, Torrent Power, ICICI Bank, ONGC, Bharti Airtel, SBI, Reliance Ind आणि ITC यासारख्या दिग्गज कंपन्यां सामील आहेत.

News Title | SBI Mutual Fund NAV Today 25 August 2024.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x