23 November 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट होईल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच प्रीमियर एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 27 ऑगस्ट 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीचा IPO 29 ऑगस्ट रोजी बंद होईल. ( प्रीमियर एनर्जी कंपनी अंश )

प्रीमियर एनर्जी कंपनीने आपल्या IPO साठी शेअर्सची किंमत बँड 427-450 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 2830 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये 1291.4 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. तसेच 3.42 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जातील. हा IPO 26 ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करत आहे.

प्रीमियर एनर्जी कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 33 शेअर्स ठेवले आहेत. अप्पर प्राइस बँडनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,850 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात, ज्यासाठी त्यांना 1,93,050 रुपये जमा करावे लागतील.

प्रीमियर एनर्जी कंपनीने आपल्या IPO मध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. तसेच 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणूक करताना प्रति शेअर 22 रुपयेची सूट दिली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात प्रीमियर एनर्जी कंपनीचा महसूल 1463.21 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर या काळात कंपनीचा खर्च 1472.19 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील एका वर्षात प्रीमियर एनर्जी कंपनीला 13.34 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये या कंपनीने 3171.31 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

तर कंपनीचा खर्च 2883.26 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत प्रीमियर एनर्जी कंपनीने 1668.79 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तसेच या काळात कंपनीचा खर्च 1423.72 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत प्रीमियर एनर्जी कंपनीने 198.16 कोटी रुपये नफा कमावला आहे. प्रीमियर एनर्जी ही एक एकीकृत सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल निर्माता कंपनी आहे. या कंपनीला व्यवसाय कार्याचा 29 वर्षांचा अनुभव आहे. या कंपनीची वार्षिक स्थापित क्षमता सोलर सेलसाठी दोन गिगावॅट आणि सौर मॉड्यूलसाठी 4.13 गिगावॅट आहे.

News Title | IPO GMP of Premier Energies Ltd 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IPO GMP(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x