19 September 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल स्कोर वाढवण्याचा सोपा उपाय, या गोष्टी करून मिळेल फायदा - Marathi News
x

Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो! या योजनेत फक्त 1300 रुपयांची बचत देईल लाखो रुपयांत परतावा, फायदा घ्या

Nippon India Mutual Fund

Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया ETF मधील SIP आणि अपफ्रंट गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळत आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या CPSE ETF ने गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या योजनेने केवळ 5 वर्षातच नाही तर गुंतवणुकदारांना 1 वर्ष, 3 वर्ष आणि 10 वर्षातही मजबूत कमाई करून दिली आहे. CPSE ETF स्कीमचा मागील 1 वर्षाचा परतावा 112.63 टक्के आहे. CPSE ETF हा प्रत्यक्षात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे.

जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दरमहा केवळ 1300 रुपये गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 5,01,655 रुपये झाले असते. जर तुम्ही या योजनेत 50000 रुपये गुंतवणूक केली असती तर, 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने तुम्हाला एकरकमी गुंतवणुकीवर 1.28 लाख रुपये परतावा दिला असता.

CPSE ETF योजनेचा परतावा :
* 5 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूक : 50,000 रुपये
* 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा : 36.57 टक्के
* 5 वर्षांसाठी मासिक SIP रक्कम : 1300 रुपये
* 5 वर्षांमध्ये SIP वर वार्षिक परतावा : 52.54% रुपये
* 5 वर्षांमध्ये मासिक SIP द्वारे एकूण गुंतवणूक : 78,000
* 5 वर्षांमध्ये योजनेतील एकूण गुंतवणूक: 50,000+78,000=1,28,000
* 5 वर्षांनंतरचे फंड मूल्य : 5,01,655

CPSE ETF च्या पोर्टफोलिओचा 99.96 टक्के भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो. यामध्ये बहुतेक रक्कम मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. एकूण गुंतवणुकीत लार्ज कॅप शेअर्सचा वाटा 93.57 टक्के आणि मिड कॅप शेअर्सचा वाटा 6.42 टक्के आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये NTPC, पॉवर ग्रिड, ONGC, कोल इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, NHPC, ऑइल इंडिया, कोचीन शिपयार्ड, NBCC India, SJVN आणि NLC India कंपनीचे शेअर्स आहेत. या म्युचुअल फंडाचा मागील 1 वर्षाचा परतावा 112.63 टक्के आहे. तर गेल्या 3 वर्षात या योजेनेने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 59.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 15.04 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nippon India Mutual Fund for investment 26 August 2024.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x