19 September 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

BHEL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा मिळणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक तेजीचे संकेत

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, बीएचईएल कंपनीच्या उपकंपनीला 11,000 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. बीएचईएल कंपनीची उपकंपनी महान एनर्जी लिमिटेडला अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)

बीएचईएल आणि महान एनर्जी लिमिटेड या दोन्ही कंपन्यांना 3 सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. हे काम मुख्यतः राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात करायचे आहे. सोमवारी बीएचईएल स्टॉक 299.45 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसभरात हा स्टॉक 2.62 टक्क्यांच्या वाढीसह 303.90 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 297.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.084 टक्के वाढीसह 297.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 184 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 418 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने लोकांना 29 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात बीएचईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 4.5 टक्क्यांनी घसरले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 105.05 रुपये होती. बीएचईएल या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,03,504 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 62.20 टक्के आहे. तसेच सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 12.71 टक्के भागभांडवल धारण केले आहे. एफआयआयने या कंपनीचे 9.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तसेच म्युच्युअल फंडाचा बीएचईएल कंपनीतील वाटा 5.36 टक्के आहे.

News Title | BHEL Share Price NSE: BHEL 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x