22 November 2024 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRFC Share Price | मागील 11 महिन्यात दिला 376% परतावा, नवीन अपडेट आली, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे (NSE: IRFC) किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अनेक निर्देशांकांमध्ये बदल जाहीर केले होते. या अंतर्गत, निफ्टी पीएसयू निर्देशांकात एलआयसी स्टॉकच्या जागी आयआरएफसी स्टॉक सामील करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 0.98 टक्क्यांच्या वाढीसह 181.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर एलआयसी स्टॉक 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 1050.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.65 टक्के वाढीसह 182.23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर एलआयसी स्टॉक 1.85 टक्के वाढीसह 1,071.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

साधारणपणे निफ्टीच्या कोणत्याही निर्देशांकात स्टॉक समाविष्ट केल्यानंतर कंपनीमध्ये गुंतवणूकीचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. आयआरएफसी कंपनीमध्ये भारत सरकारने 97 टक्के भागभांडवल धारण केले आहे. त्यामुळे या स्टॉकचा फ्री फ्लोट खूप कमी आहे. निफ्टी PSU निर्देशांक हा सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांचा निर्देशांक आहे. यामध्ये आयआरएफसी स्टॉक 30 सप्टेंबर रोजी सामील केला जाईल. 25 ऑगस्ट 2023 रोजी आयआरएफसी स्टॉक 48.10 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.

मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 376 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 229.05 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांकी किमतीवरून 21 टक्के घसरला आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 597.65 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. गेल्या 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 104 टक्क्यांनी वाढली आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1,221.50 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवरून 14 टक्के कमजोर झाला आहे.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x