22 November 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Reliance Share Price | रिलायन्स शेअरची रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, मजबूत फायदा होणार

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस CLSA ने रिलायन्स इंडस्ट्रीज (NSE: Reliance) स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या नवीन ऊर्जा प्रकल्पांचा पहिला टप्पा ऊर्जा उत्पादनासाठी सज्ज आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्मला या कंपनीची सोलर गिगा-फॅक्टरी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या होण्याचे चिन्ह दिसत आहेत. याशिवाय, सोलर गीगा-फॅक्टरी लाँच करणे हा रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.14 टक्के वाढीसह 3,005.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज हाऊस CLSA ने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 3300 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2999.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 18.90 टक्के मजबूत झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2035 पर्यंत ऑपरेशन्समधून निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने आपली पहिली सोलार गिगाफॅक्टरी बांधण्याची सुरुवात केली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 20GW सोलर पीव्ही उत्पादन स्केल करण्याची योजना आखली आहे.

2021 मध्ये आरआयएल कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत, भारतातील नवीन ऊर्जा आणि नवीन साहित्य व्यवसायासाठी सर्वसमावेशक परिसंस्था तयार करण्यासाठी 75,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने गुजरातमधील जामनगर येथे नवीकरणीय उपकरणे, बॅटरी स्टोरेज, इंधन सेल आणि हायड्रोजन तयार करण्यासाठी चार गिगा कारखाने सुरू करण्याची योजना आखली आहे.

हा प्रोजेक्ट जामनगरमध्ये 5,000 एकर जमिनीवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स या नावाने बांधला जाणार आहे. यामध्ये पाच गिगा कारखान्यांसह. फोटोव्होल्टेइक पॅनल्स, फ्युएल सेल सिस्टम, ग्रीन हायड्रोजन, एनर्जी स्टोरेज आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश असेल.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE on 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x