22 November 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IREDA Share Price | PSU IREDA शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस अपग्रेड, कमाईची मोठी संधी

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 32 रुपये होती. हा स्टॉक 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.43 टक्के वाढीसह 255.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 18.21 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. नुकताच या कंपनीने 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणीची योजना जाहीर केली आहे. वेल्थमिल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 230 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 270-280 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे.

पुढील काळात आयआरईडीए स्टॉक 300 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरईडीए स्टॉक खरेदी करताना 252 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा PAT 30 टक्क्यांच्या वाढीसह 384 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा PAT 295 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा ऑपरेशनल महसूल 32 टक्क्यांच्या वाढीसह 1,510 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 1,143 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आयआरईडीए कंपनीच्या कर्ज बुकचा आकार जून तिमाहीत 63,207 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 47,207 कोटी रुपये कर्ज वाटप केले होते. म्हणजेच कंपनीच्या कर्ज बुकमध्ये 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरईडीए या ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या सरकारी कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 75 टक्के आहे.

News Title | IREDA Share Price NSE: IREDA 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x