22 November 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Tata Power Share Price

Tata Power Share Price | शेअर बाजारात टाटा समूहाच्या अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. टाटा समूहाच्या 16 सूचीबद्ध कंपन्यांपैकी सात कंपन्या (NSE: TATAPOWER) अशा आहेत ज्यांचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे. टाटा समूहाच्या TCS कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1626058.98 कोटी रुपये आहे. ही कंपनी बाजार भांडवलानुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)

टाटा मोटर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.96 लाख कोटी रुपये आहे. तसेच टायटन कंपनीचे बाजार भांडवल 3 लाख 15 हजार कोटी रुपये, आणि ट्रेंट लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख 44 हजार कोटी आहे. तसेच टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख 93 हजार कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख 36 हजार कोटी रुपये आहे. त्यांनतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे बाजार भांडवल 1.20 लाख कोटी रुपये आहे.

सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्क्यांच्या वाढीसह 428 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मार्च 2024 ते मे 2024 या काळात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्सने 400 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने ऑगस्ट 2024 मध्ये 471 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. रिट्रेसमेंटनंतर हा स्टॉक पुन्हा 430 रुपये किमतीवर आला आहे.

आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 431.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 425 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा पॉवर कंपनीचा RSI इंडेक्स 51 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 470 रुपये किमतीवर जाऊ शकतात. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 410 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे अपेक्षित आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

News Title | Tata Power Share Price NSE: TATAPOWER 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x