22 November 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

EPF Pension Money | पगारदारांनो! EPFO ने दिली खुशखबर! EPF पेन्शन लाभार्थ्यांना देखील फायदा होणार

EPF Pension Money

EPF Pension Money | मालकी हक्कदारांना आणि पेन्शन लाभार्थ्यांसाठी EPFO ने एक खुशखबर दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघठन या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये काही लाभार्थ्यांना क्लेम सेटलमेंट आणि पोर्टल लॉगिन करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. यूजर्सच्या म्हणण्याप्रमाणे पोर्टलवर मोठ्या संख्येने लोड आल्यामुळे काही समस्या उद्भवत आहेत. ज्यामुळे काही काम अडकून राहत असल्याची माहिती समजली आहे.

अशातच मागील वर्ष जुलैमध्ये रिटायरमेंट फंड बॉडीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला तक्रार करत पत्र लिहिलं होतं. ईपीएफओ वेबसाईटने सर्व समस्यांवर काम करून लाभार्थ्यांचे काम अतिशय सोपं केलं आहे. ही खुशखबर जगजाहीर असून तीन महिन्यानंतर सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नेमके कोणते बदल केले आहेत पाहूया.

कर्मचारी भविष्य निधी म्हणजे काय?
कर्मचारी भविष्य निधी ही एक रिटायरमेंट स्कीम आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामधून ठराविक रक्कम EPFO मध्ये जमा करण्यात येते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याला ती रक्कम देण्यात येते.

3 महिन्यांतच येणार नवीन IT सिस्टम :
नवीन आयटी सिस्टम ईपीएफओवर लवकरच ट्रान्सफर होणार आहे अशी माहिती केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितल्याची समजतंय. यामध्ये ईपीएफओ 2.01 हे नवीन आयटी सिस्टम लवकरच लॉन्च होणार आहे. ज्याचा फायदा ईपीएफ आणि पेन्शन लाभार्थ्यांना होणार आहे. यामध्ये बॅलन्स चेक करण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत सर्व गोष्टी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हाताळता येणार आहेत.

अपडेट सिस्टममध्ये होणारे बदल :
* ईपीएफ लाभार्थी कर्मचाऱ्यांकडे स्वतःचं एकच अकाउंट असणार.
* बॅलन्स चेक करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत उपलब्ध करून दिली आहे.
* अकाउंट ट्रान्सफर करण्याची झंझट सुद्धा कमी होणार.
* पेन्शन लाभार्थ्यांना ठरलेल्या वेळेवर पेन्शन मिळत राहणार. ही वेळ कधीही चुकणार नाही.
* क्लेम सेटलमेंट ऑटो प्रोसेसिंग मोडवर सुरू राहणार.

वैद्यकीय एमर्जन्सीसाठी EPF चे पैसे काढण्याची मर्यादा :
आपत्कालीन परिस्थिती फक्त रुग्णालयाने सांगितलेल्या अंदाजानुसार ठराविक रक्कम काढता येत होती. परंतु आता तसं नाही. EPFO ला जोडलेले सदस्य आता एक लाख रुपये एवढी रक्कम काढू शकतात. काढणीसाठीची रक्कम एक लाख रुपये एवढी केल्यामुळे लाभार्थ्यांना याचा फायदाच फायदा अनुभवायला मिळणार आहे.

खातेदारांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवावी :
उपचारादरम्यान एक लाख रुपये काढताना 68J अंतर्गत दावा करावा लागेल. त्यामुळे खातेदार पैसे काढण्याच्या मर्यादेअंतर्गत DA, सहा महिन्यांचे मूळ वेतन आणि सदस्याचे योगदान, व्याज यांपैकी जे कमी असेल तेच काढू शकतात.

News Title : EPF Pension Money EPFO Alert 30 August 2024

हॅशटॅग्स

#EPF Pension Money(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x