22 November 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई

Business Idea

Business Idea | केंद्र सरकारने आतापर्यंत महिला रोजगाराचे अनेक उपक्रम राबवले. सर्वसामान्य स्त्रियांना गाठीशी काही पैसे बांधून ठेवण्यासाठी त्यांना स्वयं सेवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अशातच एक उदाहरण द्यायचं झालं तर, कोरोना काळामध्ये बऱ्याच महिलांनी प्रचंड प्रमाणात मास्कचे उत्पादन केले.

आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील काही पहाडी महिलांबद्दल माहिती सांगणार आहोत. या महिलांनी कोरोना काळातच एक भन्नाट व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा हा व्यवसाय जगभर प्रसिद्ध झाला असून त्यांच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. चला तर जाणून घेऊया हे उत्पादन नेमकं कोणतं आहे.

जगभरात अशा अनेक महिला आहेत ज्या साक्षरतेपासून वंचित आहेत. तरीसुद्धा काही महिला बचत गट, भिशी यांसारखे स्वयं रोजगार उपक्रम राबवताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच उत्तराखंड राज्यात नैनिताल जिल्ह्यामधील गेठिया या गावातील महीला स्वयं रोजगार हा उपक्रम राबवत आहेत. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या या महिला काही प्राकृतिक गोष्टींपासून तयार केली जाणारी सुगंधित आणि नैसर्गिक धूप तयार करत आहेत.

नैनितालमधील भिटौली परिवारातील स्वयं सहायता समूहाच्या या महीलांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यांचे धूप ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने विकले जातात. त्यांच्या या उत्पादनाला चांगलीच पसंती मिळत असल्याचं समजतय.

पहाडी महीलांच्या या हर्बल धूपची चांगली मागणी केली जात आहे असं भिटौली परिवाराच्या स्वयं सहायता समूहाच्या संस्थापक आणि सदस्या विनीता बोहरा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहीतीमध्ये समजतय. दरम्यान त्यांनी सांगितल की, “हर्बल धूपचा बिजनेस आम्ही कोरोनाकाळामध्ये सुरू केला आहे. त्यांच्या ग्रामीण भागातील 50 पेक्षाही अधिक महीला या कार्यात शामील आहेत”.

पुढे त्या सांगतात की,” गायीचं शेण आणि निरकुंडी त्याचबरोबर अपामार्गसारख्या अनेक जडीबूटी आणि वनस्पतींवर प्रयोग करून हे सुगंधीत धूप तयार केले जाते. एवढच नाही तर, जडीबूटी तयार करण्यासाठी हवन करताना लागणाऱ्या सामुग्रीचा देखील वापर केला जातो.

या धुपमध्ये सर्व नैसर्गिक सामग्रीचा वापर केला जातो आणि म्हणूनच हे धूप लावल्याणे वातावरण शूद्ध राहते. एचढच नाही तर, तुमच्या आरोग्यावर देखील याचा चांगला परिणाम पहायला मिळतो.

News Title : Business Idea cow dung make a herbal incense products 30 August 2024.

हॅशटॅग्स

#Business Idea(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x