24 November 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

BHEL Share Price | 2 वर्षात दिला 415% परतावा, आता पुन्हा मल्टिबॅगर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने महारत्न दर्जा (NSE: BHEL) असलेल्या बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (बीएचईएल कंपनी अंश)

मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 290.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म Antique ने दीर्घकाळासाठी बीएचईएल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 360 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 297 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 21 टक्क्यांनी वाढू शकतो. नुकताच अदानी समूहाने बीएचईएल कंपनीला 11000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये कंपनीला 4800 मेगावॅट 3 औष्णिक प्रकल्प स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे.

ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की बीएचईएल कंपनीला पुढील काळात आणखी ऑर्डर मिळत राहतील. तसेच कंपनीला ऊर्जा, रेल्वे, संरक्षण आणि अक्षय ऊर्जा यासारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये मजबूत व्यावसायिक संधी मिळेल. या कालावधीत कंपनीला एकूण 2.2 लाख कोटी रुपयेपर्यंत ऑर्डर्स मिळू शकतात. 2024-27 मध्ये कंपनीच्या कमाईमध्ये 156 टक्के CAGR दराने वाढ अपेक्षित आहे.

2024 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात बीएचईएल स्टॉक 415 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 106.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.03 लाख कोटी रुपये आहे.

News Title | BHEL Share Price NSE: BHEL 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x