19 April 2025 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री कोणाची? सोशल मिडीयावर गाजतयं कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं नाव

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी सीजन 5 ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होताना पाहायला मिळते. बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांनी जल्लोषात तर, कोणी देवाला गाऱ्हाण घालून ट्रॉफी मीच जिंकणार असं आश्वासन बिग बॉस मंचावर प्रेक्षकांना दिलं आहे. सध्या बिग बॉसचा टीआरपी उच्चांक गाठताना दिसतोय.

दरम्यान मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्या शनिवार-रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर सर्वांना यायला फार आवडते. अशातच बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी कधी प्रेम, कधी लाड तर, कधी धुमशान राडे करून आतापर्यंतचे सर्व आठवडे गाजवले आहेत. अशातच इरीना बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडली आहे. त्यामुळे इरिनाच्या जागेवर कोणता नवीन कंटेस्टंट येणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन वैभव घुगे तर, येणार नाही ना? अशी चर्चा होताना दिसते. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये अभिजीत बिचुकले यायला हवेत. त्याचबरोबर राखी सावंत किंवा हास्य जत्रेमधील काही कलाकार वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरामध्ये प्रवेश करतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच्या दोन टीममध्ये चांगलीच फूट पडलेली पाहायला मिळते. निक्की तांबोळी आणि जानवी कीलेकर या दोन घट्ट मैत्रिणी आता एकमेकांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटताना दिसतात. कोणी एकमेकांचा सहारा घेऊन गेम खेळत आहे तर काही जर इंडिव्हिजवली आपला गेम खेळताना दिसतायत. दरम्यान निक्की आणि अरबाज या दोघांची केमिस्ट्री पाहायला देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

News Title : Bigg Boss Marathi Wild Card Entry check details 31 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या