20 September 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Gratuity Calculator | नोकरदारांनो! तुम्हाला 5 वर्षां आधीही मिळतात ग्रॅच्युएटीचे पैसे; फायद्याचे नियम माहित आहेत?

Gratuity Calculator

Gratuity Calculator | सलग पाच वर्ष काम केल्यानंतर कंपनी आपल्याला ग्रॅच्युएटी देते. बऱ्याच खाजगी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीसंबंधित प्रश्न पडलेले असतात. आज आपण ग्रॅच्युएटी किती वर्षांच्या सेवेनंतर मिळते तसेच ती कशी मोजली जाते या सर्व गोष्टी व्यवस्थीत जाणून घेणार आहोत.

अनेक संस्थांमध्ये सलग पाच वर्ष काम केल्यानंतरच ग्रॅच्युएटी दिली जाते. हे तुम्हाला माहितचं असेल. परंतु काही नोकऱ्यांमध्ये पाच वर्षाच्या कमी कालावधीमध्ये सुद्धा ग्रॅच्युएटी देण्यात येते.

ग्रॅच्युएटी किती वर्षांनी देण्यात येते?
कोणत्याही कंपनीमध्ये सतत पाच र्वष काम केल्यावर त्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी देण्यात येते. परंतु काही कंपन्यांमध्ये ग्रॅच्युएटी कायद्याच्या कलम 2A नुसार ‘सतत कामा’ ची व्याख्या दर्शवून अनेक कर्मचाऱ्यांना पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तरीसुद्धा त्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात येऊ शकतो.

ग्रॅच्युएटी म्हणजे काय?
सध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, संस्थेकडून कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्ष काम करण्याच्या सेवेत दिला जाणारा मोबदला ज्याला आपण आभार व्यक्त प्रदर्शन देखील म्हणू शकतो. अनेक व्यक्तींना ग्रॅच्युईटीच्या माध्यमातून मोठा आर्थिक आधार मिळतो. पगार आणि ग्रॅज्युएटी कायदा हा देशातील सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होतो.

5 वर्षांच्या आतमध्ये मिळतोग्रॅच्युइटीचा पैसा
ग्रॅच्युईटी कायद्याचा कलम 2A नुसार भूमिगत खाडींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मालकासोबत काम करून चार वर्षे पूर्ण झाली असतील त्याचबरोबर पुढील 190 दिवस पूर्ण झाले असतील तर ते ग्रॅच्युईटी लाभ घेण्यास पात्र ठरतात. तर, इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार वर्षांपेक्षा 240 दिवस जास्त झाली असतील म्हणजे पाच वर्षे पूर्ण व्हायला चार महिने बाकी असतील तर, ते ग्रॅच्युएटीचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात.

News Title : Gratuity Calculator to count money before 5 years term 31 August 2024.

हॅशटॅग्स

#Gratuity Calculator(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x