24 November 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

RVNL Share Price | आता नाही थांबणार! मल्टिबॅगर RVNL शेअर पुढे मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण पूर्व रेल्वेकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढले होते. दिवसभरात हा स्टॉक 608.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

दरम्यान आरव्हीएनएल कंपनीचे 4.52 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. आरव्हीएनएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.68 टक्के घसरणीसह 597.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 2x25KV प्रणालीमध्ये 132 केव्ही ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट आणि सब सेक्शनिंग पोस्टचे डिझाइन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले आहे. हे काम खरगपूर-दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागातील भद्रक येथे होणे नियोजित आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 202.87 कोटी रुपये असून काम करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीने पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती दिली आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्या जलविद्युत आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित क्षेत्रांमध्ये सहकार्य करणार आहेत. आरव्हीएनएल कंपनीची कमाई आणि ऑर्डर बुक मजबूत आहे. त्यामुळे तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स पुढील 3 ते 5 वर्ष कालावधीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 3-4 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 निर्देशांकाचा भाग आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 148 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 233 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 372 टक्के नफा कमावून दिला आहे.

गेल्या दोन वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,744 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तीन वर्षांत हा स्टॉक 2,055 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 129.90 रुपये होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,26,498.17 कोटी रुपये आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x